बिपाशा आणि नीलची पावलं थिरकली डिजेच्या तालावर

March 1, 2009 3:03 AM0 commentsViews: 10

1 मार्च, मुंबईपिया हिंगरोनी अभिनेत्री बिपाशा बासू आणि नील नितीन मुकेश सध्या बिझी आहेत आपला नवा सिनेमा आ देखें जराच्या प्रमोशन्समध्ये. नुकतंच एका नाईट क्लबमध्ये हे दोघं जण यासाठी एकत्र आले. यावेळी नील या सिनेमातलं एक गाणं गातच मीडियासमोर आला. मग आपली बिप्स कशी मागे राहील. तिनंही निलच्या या गाण्यावर मस्त ठेका धरला. नवोदीत संगीतकार गौरव दासगुप्ताला या दोघांनी यावेळी चिअर अप केलं. कारण सिनेमातल्या या शिर्षक गीताचं रिमिक्स व्हर्जन गौरवनं बनवलंयआर डी बर्मननी गायलेलं सिनेमाचं गाणं त्यांच्याच एनर्जीमध्ये आणि स्टाईलमध्ये गाणं नक्कीच कठीण होतं. पण आम्ही आमच्या या गाण्यात हे सगळं आणायचा प्रयत्न तरी केलाय. ज्यात मी त्याच जोशमध्ये थिरकताना दिसणार आहे, असं नील नितीन मुकेश म्हणाला. या सिनेमात लवस्टोरी तर आहेच पण त्याबरोबर हा एक थ्रिलरही आहे..एक फोटोग्राफर ज्याच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नसतं..त्याला एकदा त्याच्या आजोबांचा कॅमेरा मिळतो आणि मग काय अनोखी शक्ती असणार्‍या या कॅमेरामुळं त्याचं नशीबचं बदलून जातं. यात बिपाशा डीजेची भुमिका साकारतेय. आपल्या भूमिकेविषयी बिपाशा सांगते, " सिनेमातली नायिका ही डिजे असल्यानं तिचे केस तसेच स्टाईलिश असणं गरजेचं होतं. त्यामुळं मी माझ्या केसांना एक्स्टेन्शन दिलंय. जो अजूनही माझ्या केसांमध्ये दिसतोय. त्या मुलीचा प्रवास ही सतत रात्रीचाच असतो, त्यामुळं ती अनेकदा पॅन्टस घालूनच वावरताना दिसते. ती एकदम बिनधास्त आहे, रंगीबेरंगी गंजी ती घालते. ती चारचौघींसारखी नक्कीच नाही. त्यामुळे मॅचिंग बिचिंग प्रकार तिच्याकडे नाही. सिनेमात एकदम आगळावेगळा असा तिचा लूक आहे. " " सिनेमाचा नायक फोटोग्राफर आहे. त्याच्याकडे एक वडिलोपार्जित कॅमेरा आहे. ज्यात एक वेगळी शक्ती आहे. या अनोख्या कॅमेरामुळं त्याचं आयुष्यच कसं बदलून जातं. अनेकदा अशी शक्ती मिळाली की अनेकांच्या आयुष्यातल्या समस्या कमी होतात. पण त्याला हे माहीत नसल्यानं त्याच्या आयुष्यातल्या समस्या मात्र वाढतच जातात, " असं नील नितीन मुकेश आ देखें जरा या सिनेमातल्या स्वत:च्या व्यक्तिरेखेविषयी सांगत होता. सुरुवातीला फ्रिज आणि आता आ देखें जरा हे नाव असणार्‍या या सिनेमाचं दिग्दर्शन जहांगिर सुरतीनं केलंय. येत्या 27 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय.

close