काँग्रेसचं ‘जस्ट वेट’, राष्ट्रवादी गॅसवर !

February 6, 2014 6:39 PM0 commentsViews: 1097

pawar and cm53423406 फेब्रुवारी : काँग्रेस-राष्ट्रवादीतला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी घाई कशाला अशी भूमिकाच काँग्रेसने घेतलीय. राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी तयार केलीय पण अजूनही काँग्रेस ‘हातावर घडी’ ठेवून असल्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झालीय.

आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक पुर्व आघाडी करायची आहे असं सांगितलं जात आहे पण दोन्ही पक्षांत समोरासमोर बैठकीला अजूनही मुहूर्त मिळत नाही. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीकडून जागावाटपावर चर्चा व्हावी यासाठी दबावतंत्राचा वापर केला. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्याबाबतीत संशयाची भूमिका घेतलीय. राष्ट्रवादीला खरंच आघाडी करायचीय का असा प्रश्न काँग्रेसला पडलाय. दुसरीकडे 22-26 चा असा फॉर्म्युला कायम ठेवावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

पण काँग्रेस यासाठी तयार नाहीए. 2009 ला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा काँग्रेसने 174 जागा लढल्या होत्या तर राष्ट्रवादीने 114 जागा लढल्या होत्या. त्यामुळे एका मतदारासंघात सहा विधानसभा क्षेत्र किंवा मतदारसंघ असतील तर राष्ट्रवादीच्या वाट्यात 19 लोकसभेच्या जागा येतात तर काँग्रेसच्या वाट्याला 29 जागा येतात. त्यामुळे 19-29 जागांवर चर्चा व्हावी असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय.

ही बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहित असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गेल्या सहा महिन्यापासून 22-26 चा फॉर्म्युला राहिल अशी रिघ ओढली आहे. त्यामुळे कुणी कोणता प्रस्ताव मांडायचा यासाठी पुढाकार घेण्यासाठी कुणीही पुढं यायला तयार नाहीय. त्यामुळे आघाडीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नाहीय. आज (गुरुवारी) काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली पण अजूनही जागावाटपाबाबतची बैठकी कधी होणार हे ठरले नाही.

close