महायुती ‘आप’चं मुख्य टार्गेट !

February 6, 2014 7:12 PM2 commentsViews: 1744

aap on mahayuti06 फेब्रुवारी : काँग्रेसला दिल्लीत आम्ही 8 जागांवर गुंडाळलं त्यामुळे आता काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात आहे असं आम्ही मानत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचं मुख्य लक्ष्य महायुती आहे. काँग्रेस नाही, असं आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलंय. तसंच भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरींचे पाच घोटाळे उघड करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. अंजली दमानिया यांनी आयबीएन लोकमतला आज (गुरुवारी) एक विशेष मुलाखत दिलीय. यावेळी त्यांनी पक्षांची भूमिका स्पष्ट केली.

दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने घवघवीत यश संपादीत केल्यानंतर ‘आप’ने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवलाय. देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. दिल्लीत काँग्रेसचं पानिपत करणार्‍या ‘आप’ने महाराष्ट्रात सुरूवातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरले अशी भूमिका घेतली होती.

ज्या ठिकाणी राष्ट्रवादींच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे तिथे आपचे नेते विरोधात उभे राहतील अशी रणनिती ‘आप’ने आखलीय. नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात जल संपदा खात्यातील निवृत्त अभियंते विजय पांढरे यांना उमेदवारी देण्यात आली. विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्याबाबत पत्रव्यवहार केल्यामुळे अजित पवारांना काही काळ उपमुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे विजय पांढरे यांना उमेदवारी देण्यात आली हे उघड आहे. एवढेच नाही तर खुद्द अंजली दमानिया या भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.

मात्र अलीकडेच निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये महायुतीने बाजी मारलीय. एवढेच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीत प्रवेश केल्यामुळे महायुतीची ताकद वाढलीय. महायुतीने नेते या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करणारच असा विश्वास व्यक्त करत आहे. आता आम आदमी पार्टीने वार्‍यांच्या दिशेनं जाण्याचा निर्णय घेतला दिसतोय. महाराष्ट्रात आम आदमीच्या निशाण्यावर महायुतीच आहे असं ‘आप’ने जाहीर केलंय. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत आप विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे.

  • king

    congress chi ‘A’ team Manse aani ‘B’ team AAP aahe

  • Rahul Ahire

    Not Possible At All but God Bless U ( AAP) …….. We are not considering AAP into Political race……Namo Namah……. Dats it…..One Side…..

close