नांदेड शहरातील सिलेंडरच्या स्फोटात 6 जण जखमी

March 2, 2009 5:14 AM0 commentsViews: 3

2 मार्च नांदेडनांदेड शहरात रविवारी रात्री उशीरा दोन ठिकाणी गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन सहाजण जखमी झाले. शहरातील फुले मार्केटमध्ये फुग्यांमध्ये हवा भरत असतांना हायड्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात चारजण जखमी झाले. याच सुमारास शहराच्या सिडको भागात एका कारच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात आणखी दोनजण जखमी झाले. एकाच वेळी झालेल्या या स्फोटांमुळे शहरात अफवांना पीक आलं. काही ठिकाणी तर लोकांनी हुल्लडबाजी करून दगडफेकही केली. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close