‘गूगल’च्या ‘डूडल’मधून समलिंगी संबंधांना पाठिंबा

February 7, 2014 12:14 PM0 commentsViews: 712

google doodle07 फेब्रुवारी : रोज गुगलचे होम पेज उघडताच तुम्हाला ‘गूगल’चे प्रसिद्ध ‘डूडल’ दिसतात. या डूडल्समधे नेहमीच एखाद्या व्यक्तीची माहिती किंवा एखाद्या सामाजिक विषयाबद्दलचा विचार दडलेला असतो. आजच्या ‘डूडल’मध्येही असाच एक संदेश देण्याचा प्रयत्न गूगलने केला आहे. “इंद्रधनुष्याच्या सप्तरंगां”वर वेगवेगळे खेळ खेळतानाचे खेळाडू दाखवले आहेत. त्याशिवाय या डूडल खाली गूगलने ऑलिंपिक चार्टरमधलं एक वाक्यही लिहिलं आहे.

‘खेळणे हे मानवी अधिकार आहे. प्रत्येक माणसाला कोणत्याही भेदभाव शिवाय आणि ऑलिम्पिक च्या भावनेत खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, ज्यासाठी मैत्री, ऐक्यभाव आणि निपक्ष व्यवहाराच्या भावनेसह आपसात समजूत असणे गरजेचे आहे.’ अशा आशयाचे चार्टमधली वाक्ये या डूडलखाली आपल्याला वाचायला मिळेल.

जगभरात आज पाहिल्या जाणार्‍या या डुडलबद्दल कंपनीने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण न देता, यातून योग्य तो अर्थ घ्यावा असं म्हटलं आहे. मात्र या डूडलमधून गूगलने गे-विरोधी कायद्याला आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने विरोध दर्शवल्याचे स्पष्ट होत आहे.

close