बीसीसीआयच्या धोरणामुळे क्रिकेटचं नुकसान- कपिल

March 2, 2009 11:14 AM0 commentsViews: 6

2 मार्च पुणेभारताचा माजी कॅप्टन आणि आयसीएलचा अध्यक्ष कपिल देव पुण्यात एका कार्यक्रमाला हजर होता. या कार्यक्रमात बोलताना कपिल म्हणाला, इंडियन क्रिकेट लीगबद्दल बीसीसीआय घेत असलेली भूमिका संकुचित आहे. आयसीएलविषयीच्या बीसीसीआयच्या आडमुठी धोरणामुळे क्रिकेटचं नुकसान होत आहे. आयसीएल आणि आयपीएलमधल्या वादावर तोडगा काढण्यासाठी गेल्या आठवड्यात दोन पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न आयसीसीने केला. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं झालेली बोलणी फिसकटली. त्यानंतर कपिलने पहिल्यांदाच या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

close