काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपांबाबत निर्णय नाही

March 3, 2009 7:11 AM0 commentsViews:

3 मार्च मुंबईकाँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान जागावाटपांबद्दलची चालू असलेली चर्चा सोमवारीही अपूर्णच राहिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत मराठवाडयातल्या पूर्ण तर विदर्भातील काही जागांवर चर्चा झाली. मतदारसंघ निहाय होत असलेल्या या चर्चेत दोन्ही काँग्रेसनं हक्क सांगितलेल्या जागांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. या बैठकीतही राष्ट्रवादीनं दबावतंत्राचा अवलंब करत मुंबईतल्या दोन जागांवर हक्क सांगितला. मुंबईतल्या उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन जागांची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. विदर्भातल्या उरलेल्या आणि कोकणासह मुंबईतल्या सर्व जागांबाबत आज चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर रात्री चर्चेची चौथी फेरी पार पडणार आहे. आघाडीच्या दृष्टीनं ही फेरी निर्णायक ठरेल असं दोन्ही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

close