असीमानंदचं घूमजाव, ‘कॅराव्हान’ला मुलाखत दिलीच नाही !

February 7, 2014 6:09 PM0 commentsViews: 674

56 asimanad07 फेब्रुवारी : 2007 साली देशात समझौता एक्स्प्रेस, हैदराबाद मक्का मस्जिद आणि अजमेर दर्गा या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाला संघचालक मोहन भागवत यांची संमती होती असा खळबळजनक दावा करणारा आरोपी असीमानंद याने आता घूमजाव केलंय.

आपण कॅराव्हान मासिकाला मुलाखत दिलीच नाही, असा दावा त्यांनी केलाय. आपण कॅराव्हानच्या कोणत्याही पत्रकाराला भेटलो नाही असं त्यांचं म्हणणं. हे सगळं त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय. हे पत्र आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलंय. कॅराव्हानची पत्रकार, आपण वकील आहोत, असं सांगून भेटायला आली आणि आपण तिच्याशी आपल्या समाजकार्याविषयी बोललो असं असीमानंद यांचं म्हणणं आहे.

या संभाषणात आपण मोहन भागवत किंवा इंद्रेश यांचं नाव घेतलं नव्हतं, असा दावाही त्यांनी केलाय. तर कॅराव्हन मासिकानं हे मान्य केलंय की, त्यांच्या या पत्रकाराकडे लॉ ची पदवी आहे, पण तिनी असीमानंदना हेही स्पष्टपणे सांगितलं होतं की ती पत्रकार आहे. दरम्यान, कॅराव्हान मॅगझिनच्या दिल्लीतल्या ऑफिसबाहेर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

close