मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना 75 टक्के वेतनवाढ

March 3, 2009 7:24 AM0 commentsViews:

3 मार्च मुंबईबीएमसी कर्मचा-यांना बेसिक पगारावर 75 % पगारवाढ जाहीर करण्यात आली आहे. बीएमसी आयुक्त जयराज फाटक यांनी ही माहिती दिली. मार्च 2005 पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. या पगारवाढी अंतर्गत मिळणारी थकबाकी येणा-या डिसेंबर 2010 सालापर्यंतच्या पगारात विभागून देण्यात येणार आहे. यानंतर 2010 साली पुढच्या पगारवाढीचा करार करण्यात येणार आहे. बीएमसीचे डॉक्टर आणि इंजिनिअर यांना ही पगारवाढ लागू होणार नाही. कारण डॉक्टरांच्या पगारवाढीचा करार याआधीच झालेला आहे आणि इंजिनिअर्सच्या पगारवाढीबाबत नवीन करार लवकरच करण्यात येणार आहे.

close