श्रीकर परदेशी यांची अखेर बदली

February 7, 2014 9:16 PM0 commentsViews: 1623

9-8 pardeshi 5407 फेब्रुवारी : पिपंरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली झालीय. त्यांची मुद्रांक शुल्क विभागात इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. स्वत: परदेशी यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.

तर परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने त्यांची बदली केली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती.

याविरोधात पुण्यातल्या सामाजिक संघटनाही एकत्र आल्या होत्या. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं सांगितलं होतं. तरीही अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे.

श्रीकर परदेशींची कारकीर्द

  • - नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाची यशस्वी अंमलबजावणी
  • - पटपडताळणीचं काम चोखपणे पार पाडलं
  • - पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम
  • - पीसीएमसी अधिकार्‍यांचीही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली
  • - हे काम करताना त्यांना आतापर्यंत 7 वेळा धमक्या आलेल्या आहेत.
  • - प्रचंड राजकीय दबाव असतानाही निडरपणे ही मोहीम त्यांनी सुरू ठेवलीय.
close