तेलंगणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

February 7, 2014 10:15 PM0 commentsViews: 200

telangan 353407 फेब्रुवारी : तेलंगणा विधेयक अखेर केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलंय. हैदराबादला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला नाही. तर हैदराबाद तेलंगणा आणि सीमांध्रची संयुक्त राजधानी असणार आहे. हैदराबादच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपालांकडे सोपवण्यात आलीय.

आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेलं हे विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर केलं जाईल. हे विधेयक आंध्र प्रदेशच्या विधानसभेनं फेटाळलं होतं. खुद्द मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनीच आंध्रच्या विभाजनाला विरोध केला होता. संसदेचं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दिल्लीत जंतर-मंतरवर आपल्याच सरकारविरोधात धरणंही दिलं होतं.

यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि रेड्डी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं जाऊ शकतं,अशी माहिती काँग्रेसमधल्या सूत्रांकडून मिळतेय. आजही तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. तर स्वतंत्र तेलंगणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या 9 याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळल्या.

close