2011 मध्ये होणा-या वर्ल्डकपचे पाकिस्तानातले सामने रद्द

March 3, 2009 12:55 PM0 commentsViews: 2

3 मार्च, संदीप चव्हाण पाकिस्तान दौर्‍यावर गेलेल्या श्रीलंकन टीमवर झालेल्या दहशतादी हल्ल्याच्या संपूर्ण क्रिकेट जगतातून निषेध केला जात आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीनं 2011मध्ये होणार्‍या वर्ल्ड कपच्या आयोजनातले पाकिस्तानमध्ये होणारे सामने रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.'लाहोरमध्ये श्रीलंकन क्रिकेट टीमवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या भ्याड हल्ल्याचा अवघ्या क्रिकेट जगतानं निषेध केलाय.जखमी झालेल्या 6 श्रीलंकन खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मी मनापासून ईश्‍वराकडे प्रार्थना करतो. तसेच या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त करतो.मी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट बोर्डांशी चर्चा करून हा उर्वरित दौरा रद्द केलाय, ' अशी प्रतिक्रिया आयसीसीचे संचालक हरून लोगार्ट यांनी दिली. 'श्रीलंकन खेळाडूंवरील या हल्ल्याची आयसीसीनं गंभीर दखल घेतली आहे. भारतीय उपखंडात 2011 साली होणार्‍या वर्ल्ड कपचे सामने पाकिस्तानात होणार नाहीत, ' असंही आयसीसीचे संचालक हरून लोगार्ट म्हणाले.

close