नंदुरबारमध्ये ‘दंबग’ जिल्हाधिकार्‍यांसाठी कडकडीत बंद

February 8, 2014 2:02 PM0 commentsViews: 523

45 nandurbar band 234508 फेब्रुवारी : नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांच्या मुदतपूर्व बदलीच्या विरोधात आज (शनिवारी) कडकडीत बंद पाळण्यात आलाय.

जिल्हाधिकारी बकोरिया यांची बदली राजकीय दबावातून झाल्याच्या नंदुरबारमधल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. बकोरिया यांनी वाळू माफियांच्या विरोधात आणि जमीन माफियांच्या विरोधात कडक कारवाई केली होती.

बकोरियांच्या बदलीविरोधात नंदुरबामध्ये पाळण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संस्था- संघटना आणि विरोधी पक्ष सहभागी झाले आहेत. नंदुरबारमधल्या रखडलेले अनेक प्रश्न बकोरियांनी मार्गी लावल्याचे नागरिकांचे अनुभव आहेत. त्यांची ही मुदतपूर्व बदली रद्द करण्याची मागणी नंदुरबारमधल्या संस्था-संघटनांनी केली आहे.

close