दिल्ली – 6 ला बॉक्स ऑफिसवर उरती कळा

March 3, 2009 1:36 PM0 commentsViews:

3 मार्च अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर ने दिल्ली 6 च्या प्रमोशसाठी सगळे प्रयत्न केलेत. पण या प्रमोशनचा सिनेमाला अजिबात फायदा झाला नाही. पहिल्या वीकेन्डला या दिल्ली 6 ची कमाई होती 16 कोटी रुपये. पण यानंतर कलेक्शनला उतरती कळा लागली. सर्वात जास्त नुकसान झालं ते डिस्ट्रीब्युटर्सचं. मोठ्या किंमतीला त्यांनी हा सिनेमा विकत घेतला पण पहिल्या आठवडयात त्यातले आठ कोटी रुपयेच त्यांना कमावता आले.अठ्ठेचाळीस कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमाने प्रोड्युसरचं नुकसान तर झालं आहे. ' दिल्ली 6' कडून सुरुवातीलाअपेक्षा तर खूप होत्या. आसपास कोणताही मोठा सिनेमा रिलीज होत नसल्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असंच वाटत होतं. सिनेमातल्या गाण्यांनी चांगली हवा तयार केली होती. पण पहिल्या आठवडयातच या सिनेमाची हवाच निघून गेली. बिनोद प्रधान यांची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि ऑस्कर विजेत्या ए.आर.रेहमानची सुमधूर गाणी या सिनेमाला तारू शकली नाहीत. त्यांच्या जोडीला चांगली कथासुध्दा लागते याचा राकेश मेहराला कसा काय विसर पडला याचंच सर्वांना आश्चर्य वाटत होतं.अभिषेक बच्चन आणि सोनम कपूरलाही काही फायदा मिळाला नाही. द्रोणानंतर सलग दुसरं अपयश पदरात पडल्यानं अभिषेकच्या सिंगल हिरो फिल्म्स चालत नाहीत अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाली आहे.

close