भारताची विजयासाठी 320 धावांची ‘कसोटी’

February 8, 2014 7:59 PM0 commentsViews: 610

976 india test08 फेब्रुवारी : ऑकलंड मध्ये सुरू असलेली भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट आता रंगतदार अवस्थेत आली आहे. भारताने दुसर्‍या इनिंगमध्ये दिवसअखेर 1 विकेट गमावत 87 रन्स केले आहेत.

भारताला विजयासाठी आणखी 320 रन्सची गरज आहे. त्याआधी भारताची पहिली इनिंग आज 202 रन्सवर ऑलआऊट झाली. पण 301 रन्सची आघाडी घेतलेल्या न्युझीलंडची टीम दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र फक्त 105 रन्सवर गडगडली. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

याला उत्तर देताना भारताने आता दुसर्‍या इनिंगमध्ये 1 विकेट गमावत 87 रन्स केलेत. शिखर धवन 49 तर चेतेश्‍वर पुजारा 22 रन्सवर खेळत आहे. मॅचचे आणखी दोन दिवस बाकी असून भारतीय बॅट्समनना आता विजयासाठी झुंज द्यावी लागणार आहे.

close