टोलविरोधात महायुतीचा 18 फेब्रुवारीला महामोर्चा

February 8, 2014 7:25 PM0 commentsViews: 420

kolhapur toll update08 फेब्रुवारी : टोलविरोधात आता महायुतीने रणशिंग फुंकले आहे. येत्या 18 तारखेला कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महायुती महामोर्चा काढणार आहे.

शहरातल्या गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल. आज (शनिवारी) कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर महायुतीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली.

टोलविरोधी कृती समिती सोबत असल्याचं स्पष्टीकरणही महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी दिलंय. दुसरीकडे टोललविरोधी कृती समितीची स्वतंत्र बैठक होणार असून शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या उपस्थितीत कृती समितीच्या टोल विरोधी आंदोलनाची दिशा स्पष्ट होईल.

close