नरेंद्र मोदींना भेटलो त्यात विशेष काय ?-पवार

February 8, 2014 10:30 PM0 commentsViews: 5046

sdhres347 pawar 6308 फेब्रुवारी : आपण ज्या राज्यात जातो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतो त्यांच्याशी विकास कामासंबंधी चर्चा करतो तसंच आपण अहमदाबादला गेल्यावर नरेंद्र मोदीना भेटतो. मोदींना भेटण्यात गैर ते काय ? मी काही कोण्या पाकिस्तानी किंवा चीनी माणसाला भेटलो काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय.

ठाण्यात इन्डोर स्टेडियमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्तानं शरद पवारांनी जाणीवपूर्वक त्यांच्या आणि मोदींच्या भेटीचा वाद उपस्थित करत पुन्हा एकदा काँग्रेसला गर्भित इशारा दिला आहे.

मागील महिन्यात 31 जानेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याची बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र नरेंद्र मोदींशी आपली भेट झालेली नाही, ही बातमी, पूर्णपणे खोडसाळ, आधारहीन आणि चुकीची आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

एका वृत्तपत्रात आलेली, मी नरेंद्र मोदी यांना 17 जानेवारीला नवी दिल्लीत भेटलो, ही बातमी, पूर्णपणे खोडसाळ, आधारहिन आणि चुकीची आहे. राज्यांच्या भेटीदरम्यान किंवा दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेदरम्यान, मी मुख्यमंत्र्यांना भेटत असतो आणि हे प्रसंग सोडले तर मी गेल्या एका वर्षभरात मोदींना कधीही भेटलेलो नाही असं स्पष्टीकरणच पवार यांनी दिलं होतं.यापूर्वी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पवार मोदी भेट झाल्याचं नाकारलं होतं पण खुद्द शरद पवारांनीच आता या भेटीची चर्चा उकरुन काढलीय.

हे पण वाचा -

» मोदींच्या भेटीची बातमी चुकीची – शरद पवार

close