ऑकलंड टेस्ट 40 रन्सनं गमावली, शिखर धवनची सेंच्युरीही वाया

February 9, 2014 2:14 PM0 commentsViews: 429

dhoni_0902getty_63009 फेब्रुवारी :  न्यूझीलंड च्या दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा सिलसिला सुरुच आहे. 5 वनडेंची सिरीज 1-0नं गमावल्यानंतर आता ऑकलंड टेस्टही धोनीच्या टीमने गमावली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 407 रन्सचा टर्गेट गाठताना, टीम इंडियाने आवघ्या 366 रन्समध्ये पराभव स्वीकारावा.

या टेस्टमध्ये तिसरी इनिंग्ज वगळता भारताची टीम पेक्षेनुसार कामगिरी करू शकली नाही. आज सकाळी चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवन ही जोडी मैदानात उतरली तेव्हा जिंकण्यासाठी 320 रन्स करायच्या होत्या, मात्र शिखर धवन आणि थोडा फार विराट कोहलीचा अपवाद वगळता भारतीय बॅट्समन किवीजपुढे तग धरू शकले नाहीत आणि सर्व टीम 366मध्ये पॅव्हेलियनमध्ये परतली. शिखर धवननं सेंच्युरी ठोकली तर विराट कोहलीनं 67 रन्स केल्या.

सलामीच्या शिखर धवननं धडाकेबाज शतक झळकावूनही टीम इंडियाचा दुसरा डाव ३६६ धावांत आटोपला. या कसोटीत भारतानं तिसऱ्या दिवसअखेर एक बाद ८७ धावांची मजल मारली होती. पण शिखर धवननं विराट कोहलीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १२६ रन्सची भागीदारी रचून, भारतीय आव्हानातील जान कायम राखली.  मात्र, याशिवाय चेतेश्‍वर पुजारा, रोहित शर्मा व अजिंक्‍य रहाणे यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. जडेजा २६ धावांवर बाद झाल्यावर झहीर खानने धोनीला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र झहीर खान१५ धावांवर बाद झाला. त्यानंतर, संघाला विजय मिळवून देण्याची र्सवकामगीरी कॅप्टन धोनीच्या खांद्यावर होती. पण कोणीही धोनीस पुरेशी साथ देऊ शकले नाहीत.

close