एडस् रुग्णांसाठी काम करणारी आरकॉन संस्था बंद पडणार

March 3, 2009 2:04 PM0 commentsViews: 7

3 मार्च, मुंबई अलका धुपकर एडस आणि एचआयव्हीशी लढण्यासाठी जागतिक स्तरावरून लाखो रुपयांचा निधी भारताला दिला जातोय. त्याच निधीचा वापर करुन कित्येक एनजीओही उभ्या राहिल्यात. पण मुंबईत मात्र, फंड मिळत नसल्याने आरकॉन ही सरकारचीच एनजीओ बंद केली जातेय. आरकॉन म्हणजे एड्स रिसर्च ऍन्ड कंट्रोल सेंटर. 1994 मध्ये मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलच्या कॅम्पस्‌मध्ये हे सेंटर सुरू झालं. एचआयव्हीने ग्रस्त असलेले दहा हजार पेशंटस इथे काऊन्सिलिंगसाठी येतात. आरकॉन बंद होत असल्यामुळे या सगळ्यांचे हाल होणारेयत. नवीन फंड मिळवण्यासाठीही आरकॉनतर्फे कुठलेच प्रयत्न केले जात नाहीयेत. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी रुग्णांकडून होतेय.

close