बँक कर्मचारी संपावर, सर्वसामान्य उघड्यावर

February 10, 2014 12:02 PM0 commentsViews: 668

Bank10 फेब्रुवारी :  वेतनवाढीच्या मागणीसाठी १0 लाख बँक कर्मचारी आज सोमवारपासून दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर जात आहेत.  बँक कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यात यावेत, यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचार्‍यांनी हा बंद पुकारला आहे. या दोन दिवसांच्या संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प पडणार आहे.

बँकांना शनिवारी अर्धी सुट्टी, रविवारी साप्ताहिक सुट्टी, सोमवार, मंगळवार या सलग दोन दिवशी संप, यामुळे सलग चार दिवस बँक व्यवहारांचा बोजवारा उडाला आहे. पण बँकांचे कर्मचारी संपावर जाणार असल्याने गैरसोय होईल, हे आधीच सांगण्यात आल्याचे संपकरी कर्मचार्‍यांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

वेतनवाढीबाबत बँक कर्मचाऱ्यांची संघटना यूएफबीयूने केंद्रीय कामगार आयोग आणि इंडियन बँक्स असोसिएशनशी चर्चा केली. मात्र या चर्चा निष्फळ ठरल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने संपाचं हत्यार उपसलं आहे. या संपात ऑल इंडिया स्टेट बँक ऑफिसर्स फेडरेशन व ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन सामील झाले आहे.

याच मागण्यांसाठी यापूर्वी 18 डिसेंबरला सरकारी बँकांचे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले होते. एकूण 27 सरकारी बँकांच्या 50 हजार शाखांमधले तब्बल 8 लाख कर्मचारी संपावर जाणार असल्याने याचा व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

close