‘जनलोकपाल’ मंजूर न झाल्यास राजीनामा देईन -केजरीवाल

February 10, 2014 2:13 PM0 commentsViews: 486

Image img_185142_kejriwal-social-activist_small_240x180.jpg10 फेब्रुवारी :  विधानसभेत जनलोकपाल विधेयक मंजूर झाले नाही तर मी राजीनामा देईन, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. हे विधायक संमत झाले नाही तर आपल्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.

या विधेयकाला दिल्ली सरकारला पाठींबा देणारा काँग्रेस, त्याच बरोबर भाजपने विरोध क रत केजरीवालांवर राजकीय नेत्यांनी टीका केली आहे.

दिल्ली विधानसभेत जन लोकपाल विधेयक 13 फेब्रुवारीला मांडलं जाणारे आहेत. आम आदमी पार्टीने घटनात्मक प्रक्रिया पाळली तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊ, असं काँग्रेसने म्हटल आहे.

अरविंद केजरीवाल याबद्दल नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेणार आहेत. याआधी, नजीब जंग यांनी जनलोकपाल विधेयकाबद्दल सॉलिसिटर जनरलचं मत मागितले होते. त्यामुळे आम आदमी पार्टीची निराशा झाली.

close