तेलंगणाच्या मुद्द्यावरून राज्यसभा दोन वाजेपर्यंत तहकूब

February 10, 2014 1:34 PM0 commentsViews: 90

rajya-sabha2-pti10 फेब्रुवारी :   तेलंगणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत आज पुन्हा गदारोळ झाला. स्वतंत्र तेलंगणाच्या विधेयकाला विरोध करणार्‍या सभासदांनी संसदेच्या वरिष्ठ सदनात हुल्लडबाजी केली. यावेळी सभासदांनी उपसभापतींसमोर कागद फेकले, तसंच त्यांच्यासमोरचा माईकही फेकला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

यानंतर पंतप्रधानांनी तेलंगणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधकांना बोलावले. संसदेचे ठप्प झालेले काम सुरू करण्यावर चर्चा केली जाणार आहे.

पंधराव्या लोकसभेमध्ये आतापर्यंत सर्वात कमी विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. या लोकसभेच्या कार्यकाळातल्या सर्वात शेवटच्या अधिवेशनातही कामकाज सुरळीत पार पडत नाहीयेे. अजूनही काही महत्त्वाची विधेयकं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळेच पंतप्रधानांनी आता पुन्हा एकदा विरोधकांना विश्वासात घेण्याचं ठरवलेलं दिसतंय.

close