मंदीमुळे हरियाणा सरकारची डीएलएफवर कृपा

March 3, 2009 3:42 PM0 commentsViews: 2

3 मार्च हरियाणा सरकारनं डीएलएफ या रिअल्टी डेव्हलपर कंपनीकडून घेतलेली 202 कोटी रुपयांची लायसन्स फी परत केल्याची माहिती सूत्रांकडून समजलीय. मंदीमुळे सध्या डिएलएफ आर्थिक अडचणीत सापडलीये. त्यामुळे कंपनीनं हरियाणात मंजूर न झालेल्या दीडशे एकर जमिनीसाठी दिलेली लायसन्स फी परत द्यावी अशी मागणी केली होती. हरियाणा सरकार उर्वरित 38 कोटी रुपयेही कंपनीला परत देणार आहे डिएलएफनं या दीडशे एकर जमिनीसाठी भरलेला लायसन्स अर्ज हरियाणा सरकारकडे पडून होता.

close