टोलच्या नावाखाली बेकायदा मायनिंगचा घाट

February 10, 2014 4:46 PM0 commentsViews: 580

2346 toll sindhu 4508 फेब्रुवारी : राज्यभरात टोलवरून वादंग माजला असतानाच सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर बांदा इथं उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याचं काम उत्कृष्ट प्रतीच्या लोहखनिजाच्या भागात सुरू आहे.

शिवाय या कामासाठी शेतकर्‍यांच्या तब्बल सात हजार 400 झाडांची बेकायदा कत्तल करण्यात आली. शेतकर्‍यांनी अनेक वेळा आंदोलनं करुनही हे काम थांबवण्यात आलेलं नाही. त्यामुळे टोल नाक्याच्या नावाखाली बेकायदा मायनिंग प्रकल्पाचा घाट या ठिकाणी घातला घेल्याचा आरोप शेतकरी करत आहे.

close