युरोपियन मोटर शोमध्ये नॅनोचं मॉडेल दाखल

March 3, 2009 3:44 PM0 commentsViews: 5

3 मार्च नॅनोसाठी आता युरोपचे रस्तेदेखील खुले झालेयत. लवकरच नॅनो भारतीय रस्त्यांवर धावेल तशी युरोपातल्या रस्त्यांवरही तिचं स्वागत होणारेय. या एक लाखांच्या गाडीचं युरोपियन मॉडेल आज जिनेव्हा इथं होत असलेल्या मोटर शोमध्ये दाखवण्यात येणार आहे. नॅनोचं हे युरोपियन मॉडेल भारतीय मॉडेलपेक्षा तांत्रिकदृष्ट्या जास्त अत्याधुनिक, जास्त इंधन क्षमतेचं आणि कमी प्रदूषण करणारं असेल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. युरोपियन स्टँडर्डनुसार नॅनोचं हे व्हर्जन बनवण्यात आलंय. भारतात नॅनो येत्या 23 मार्चला लॉन्च होतेय.

close