काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी निश्चित

March 4, 2009 4:55 AM0 commentsViews: 4

4 मार्च मुंबईलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान आघाडी होणार हे आता स्पष्ट झालं. जागावाटपाची चौथी फेरी मंगळवारी रात्री रामटेक बंगल्यावर झाली. या बैठकीत 40 जागांवर चर्चा झाली. केवळ 8-10 जागांबाबत एकमत व्हायचं आहे. यावर येत्या 2-3 दिवसात दोन्ही पक्षांचे हायकमांड चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली. याबैठकीला दोन्ही काँग्रेसचे नेते उपस्थित होते.प्रादेशिक पातळीवरची आमची चर्चा झाली आहे. आता या चर्चेतील माहिती आम्ही आपापल्या हायकमांडना देऊ. आता ज्या 8-10 जागा बाबतचा निर्णय राहिलेला आहे तो दिल्लीतच घेतला जाईल,अशी माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

close