खुशखबर! ‘युपीएससी’साठी दोन वाढीव संधी, वयातही सूट

February 11, 2014 9:23 AM0 commentsViews: 2261

Parliament india mini_tcm2590-46504510 फेब्रुवारी : युपीएसी म्हणजेचं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस, आयपीस आणि आयएफएस उमेदवारांनासाठी एक दिलासा देणारी बातमी. केंद्राने यूपीएसयी परीक्षेसाठी बसण्यांना आणखी दोन वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता चार संधी ऐवजी सहा वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी वयोमर्यादाही शिथिल केली आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींकडे तक्रार केली होती. त्यानंतर राहुल गांधींच्या हस्तक्षेपानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यूपीएससीत्या परीक्षेचं वेळापत्रकानुसार, 24 ऑगस्टला या परीक्षा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अर्ज भरण्याची अंतिम तारीख अजून जाहीर केली नसल्याने हा निर्णय याच वर्षा पासून लागू होणार आहे.

काय बदल झालेत?

आधी, ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना परीक्षेत बसण्यासाठी 4 संधी मिळत होत्या पण आता त्यांना 6 वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुमचं वय 30पक्षा कमी असेल आणि या आधी तुम्हाला चार वेळा परीक्षा देऊनही यश मिळालं नसेल तर आता तुम्हाला आजून दोन संधी मिळाल्या आहेत. पण या 6 संधींसाठी तुम्हाला वायाच्या 32वर्षापर्यंच सूट मिळेल.

तर ओबीसी कॅटेगरीसाठी आता 7 ऐवजी 9 संधी मिळणार आहेत आणि वयोमर्यादा 33 ऐवजी 35 वर्षं राहणार आहे. एससी आणि एसटी कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी संधींची कमी नाही पण 37 वर्षांची वयोमर्यादा मात्र पाळावी लागणार आहे.

दरम्यान, हा निकाल लागल्यानंतर दिल्लीमध्ये यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष साजरा केला.

close