न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द

March 4, 2009 6:13 AM0 commentsViews: 2

4 मार्च मंगळवारी श्रीलंकन क्रिकेट टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूझीलंडनंही आपला पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. असं असलं तरी त्रयस्त ठिकाणी,पाकिस्तानबरोबर खेळायला न्यूझीलंड टीम तयार आहे. नोव्हेंबर महिण्यात न्यूझीलंडची टीम पाकिस्तानच्या दौ-यावर जाणार होती.पण श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या हल्ल्यानंतर, न्यूझीलंडनं पाक दौरा रद्द केला.दरम्यान दौरा रद्द करून श्रीलंकेची टीम मायदेशी परतली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच अबुधाबी मार्गे श्रीलंकेची टीम, मायदेशी रवाना झाली होती. एअरपोर्टवर खेळाडूंना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.

close