भूखंड प्रकरणात विलासराव देशमुखांसहित 9जणांना हायकोर्टाची नोटीस

March 4, 2009 7:05 AM0 commentsViews: 4

4 मार्च एमआयडीसीचे भूखंड अल्पदरात विकल्याच्या प्रकरणात हाय कोर्टानं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह नऊ जणांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस गुरुवारी बजावली असून सहा आठवड्यात या नोटीसीचं उत्तर हायकोर्टानं मागितलं आहे. भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेनं 2006 मध्ये हाय कोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह गृहमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री पतंगराव कदम, शरद पवारांचे भाऊ प्रतापराव पवार, काँग्रेसचे नेते दत्ता मेघे, रवी शेंडे, भाऊसाहेब मुळीक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि जेष्ठ शिक्षण तज्ञ डी. वाय. पाटील यांना नोटीस बजावल्या गेल्या आहेत. राज्य सरकारवर 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज असतांना एमआयडीसीचे भूखंड शासनाने आणि एमआयडीसीने अल्प दरात विकल्याचा आरोप या जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

close