ईशांत शर्माची ‘विकेट’ पडली, रैनाही ‘आऊट’

February 11, 2014 2:46 PM0 commentsViews: 2348

rthb ishant sharma 2352611 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंड दौर्‍यावर खराब फॉर्ममुळे संघाची विकेट पाडणार्‍या ईशांत शर्माला भारतीय किक्रेट कंट्रोल बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बांग्लादेशमध्ये होणार्‍या एशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. फास्ट बॉलर ईशांत शर्माला दोन्ही टीममधून वगळ्यात आलं आहे. तसंच मधल्या फळीचा भार पेलण्यात अपयशी ठरलेल्या सुरेश रैनाला एशिया कप स्पर्धेसाठीच्या भारतीय टीममधून बाहेर ठेवण्यात आलंय तर युवराज सिंगला विश्रांती देण्यात आलीय.

मात्र टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये मात्र सुरेश रैना आणि युवराज सिंगचा समावेश करण्यात आला आहे. तर भारतीय टीमसाठी चोख भूमिका बजावण्यारे चेतेश्वर पुजारा, स्टुअर्ट बिन्नी आणि ईश्वर पांडेला संधी देण्यात आली आहे.

अशी असेल टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

महेंद्र सिंग धोणी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सामी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहित शर्मा आणि वरुन एरोन

अशी असेल एशिया कपसाठी भारतीय टीम

महेंद्र सिंग धोणी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अबांती रायडू, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, वरुन एरोन, अमित मिश्रा आणि ईश्वर पांडे
 

close