गांजा माफिया संतोष काळेला अटक

March 4, 2009 4:44 AM0 commentsViews: 25

4 मार्च पंढरपूरपंढरपुरातील कुप्रसिद्ध गांजा माफिया संतोष काळे यांच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी 8 पोत्यांमधला तब्बल 556 किलो गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 25 लाख एवढी आहे. पोलिसांच्याच आशीर्वादामुळे संतोष काळेचा हा धंदा राजरोस सुरू होता. संतोष काळे पंढरपुरातील अनेक मठ, तसंच धर्मशाळांना छुप्या पद्धतींन गांजा पुरवत असे. त्यामुळे तीर्थक्षेत्र आणि वारक-यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरची बदनामी होत होती. अखेर पोलिसांनीच ही कारवाई करून संतोष काळेच्या मुसक्या आवळल्या आहेत.

close