निवडणूक इफेक्ट, रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही

February 12, 2014 3:55 PM0 commentsViews: 236

Image img_188132_indianrail_240x180.jpg12 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेल्या रेल्वे बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आलाय. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाहीये.

रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी रेल्वे बजेट सादर केलंय. या बजेटमध्ये दिल्ली-मुंबई विभागात 17 नवीन प्रिमियम आणि 38 एक्स्प्रेस ट्रेन जाहीर केल्या आहेत. तसंच 19 नवीन लाईन्स आणि अस्तित्वात असलेल्या 5 लाईन्सचं दुहेरीकरणही करण्यात येणार आहे. रेल्वेच्या गरजा काय आहेत याची गांभिर्याने दखल घेण्याची गरज असल्याचं मत खर्गे यांनी व्यक्त केलंय.

काश्मीर तसंच ईशान्येकडील राज्यांना जोडणार्‍या रेल्वे प्रकल्पांचं कामही सुरू असल्याचं खर्गे यांनी सांगितलंय. मात्र लोकसभेत तेलंगणाच्या मुद्यावरुन गदारोळ झाला त्यामुळे खर्गे यांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

close