आयपीएल लिलावात 14 कोटींचा युव’राज’

February 12, 2014 3:06 PM0 commentsViews: 1802

Image img_216382_yuviisback_240x180.jpg12 फेब्रुवारी : आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये लिलाव सुरू आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली लागली ती युवराज सिंगसाठी..रॉयल चॅलेंजर बंगळुरूनं त्याच्यासाठी तब्बल 14 कोटी रूपये मोजले आहे.

युवराज यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरियर्सकडून खेळलाय. युवराज खालोखाल सर्वाधिक पैसे मिळाले ते दिनेश कार्तिकला. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं त्याच्यासाठी साडेबारा कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम मोजण्याचं मान्य केलंय.

दिल्लीनंच केविन पीटरसनसाठी 9 कोटीची बोली लावली आहे. मात्र, प्रवीणकुमार, महेला जयवर्धने आणि रॉस टेलर यांना अजून कोणी खरेदी केलेलं नाही. आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिलकडून आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार्‍या विरेंद्र सेहवागची पहिल्यांदाच बोली लागली. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं विकत घेतलं.

close