श्रीलंकन टीमवरील हल्ल्याप्रकरणी 12 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल

March 4, 2009 12:28 PM0 commentsViews: 3

4 मार्च लाहोरश्रीलंकन टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये तपासाची चक्रं वेगानं फिरू लागली आहेत.लाहोर पोलिसांनी रात्री केलेल्या कारवाई 12 संशयितांना ताब्यात घेतलं. हे सगळे गद्दाफी स्टेडियम आणि लिबर्टी चौकजवळच्या गुलबर्ग भागातल्या एका हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत. दरम्यान या हल्ल्याची माहिती देणा-याला एक कोटी रुपयांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा पंजाब प्रांत सरकारनं केली आहे.दरम्यान या हल्ला मुंबई हल्ल्यासारखाच असल्यानं या तपासात भारताकडे मदतीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

close