बाळासाहेब ठाकरेंच्या तब्येतीत सुधारणा

March 4, 2009 12:48 PM0 commentsViews: 2

4 मार्च मुंबईशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीत सुधारणा होतेय. त्यांना लीलावती हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांना दुस-या रूममध्ये ठेवण्यात आलं आहे. गुरुवारी त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्यामळे वांद्र्याच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट झाले होते. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांची भेट घेतल्यानंतर मीडियाला ही माहिती दिली. बाळासाहेबांची तब्येत सुधारली असलीतरी घरी गेल्यावर त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येऊ शकतील. त्याचा त्रास बाळासाहेबांना होईल, म्हणून अजून दोन-तीन दिवस त्यांना आराम मिळावा यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

close