औरंदगाबादमधल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकरली

March 4, 2009 1:04 PM0 commentsViews: 3

4 मार्च, औरंगाबाद संजय वरकडलोकसभा निवडणूक प्रचारासाठी उद्या औरंगाबादमध्ये होणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आलीय. जिल्हाधिकार्‍यांनी ह्या सभेला परवानगी दिलेली नाही. औरंदगाबादेतल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार होती. शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून दरी निर्माण झाली आहे. शिवसेना प्रमुखांनी राज्यातल्या ज्या ज्या मैदानावर सभा घेऊन त्या गाजवल्या होत्या, त्याच मैदानांवर भाजप सभा घेण्याच्या तयारीत होता. आगामी सभा ही औरंगाबादेत होती. त्या सभेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती. पण अचानक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागली. परिणामी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदानात कोणत्साही पक्षांच्या सभा होणार नाहीत आणि तशी परवानगी नाहीये, असं कारण सांगून सभेला संमती नाकारली.

close