अर्भक चोरी प्रकरणी कोर्टानं प्रशासनाला फटकारलं

March 4, 2009 12:20 PM0 commentsViews: 5

4 मार्च मुंबईसायन हॉस्पिटल अर्भक चोरी प्रकरणी कोर्टानं पोलीस, हॉस्पिटल प्रशासन आणि महानगरपालिकेला फटकारलं आहे. चोरीला गेलेल्या अभ्रकाचा शोध घेण्यासाठी प्रशासन काहीच करत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय.तसंच मुलाच्या पालकांना 10 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा आदेशही, कोर्टानं मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील अमित कारखानिस यांनी, मुलाच्या पालकांना जो मानसिक मात्र झाला आहे त्यांची नुकसान भरपाई द्यावी.तसंच त्या नुकसान भरपाईची रक्कम 10 लाखांपेक्षा कमी नसावी असे आदेशही महापालिकेला दिले आहेत अशी माहिती दिली.

close