मंडलिकांनी थोपटले दंड, राष्ट्रवादीला जागा देऊ नका !

February 12, 2014 7:29 PM0 commentsViews: 793

Image img_232252_mandliksot346_240x180.jpg12 फेब्रुवारी : लोकसभेसाठी कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेसचे सहयोगी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे. कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूरची जागा काँग्रेसकडेच राहावी असा आग्रह त्यांनी हायकमांडकडे धरलाय. यानंतरही जर जागा मिळालीच नाही तर आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरीचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाशिव मंडलिकांचा मुलगा संजय मंडलिक यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्ठं राजकारण घडू शकतं, हे स्पष्ट झालं.

2009 च्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये अपक्ष उमेदवार सदाशिव मंडलिकांनी राष्ट्रवादीच्या संभाजीराजे गायकवाड यांना हरवले होते. त्यानंतर सदाशिव मंडलिक काँग्रेसचे सहयोगी सदस्य बनले. पण आता राष्ट्रवादी मात्र कोल्हापूरची जागा सोडायला तयार नसल्यानं सदाशिव मंडलिक बंडखोरीची भाषा करत आहे.

कोल्हापूरच्या जागेवरून आघाडीत जुंपण्याची चिन्हे असतानाच महायुतीचे नेतेसुद्धा पुढे सरसावले. स्वाभिमानी शेतकरीचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाशिव मंडलिकांचे पूत्र संजय मंडलीक यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्ठं राजकारण घडू शकतं, हे स्पष्ट झालं. एकू णच काय, कोल्हापूरच्या जागेवरून आघाडीत नव्यानं पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.

close