आज दुपारी 12 वाजता तेलंगणा विधेयक मांडले जाणार

February 13, 2014 11:04 AM0 commentsViews: 110

Image img_219392_sansadbhavan_240x180.jpg13 फेब्रुवारी : तेलंगणा विधेयकावरून काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. आज दुपारी 12 वाजता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. याबाबत पंतप्रधानांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली तर काही वेळापूर्वीच संसदीय कामकाज मंत्री कमल नाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर सरकार आज संसदेत विधेयक मांडणार आहे. पण तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या कामकाजात सातत्याने अडथळे आणले जात आहे. त्यामुळे यूपीए सरकारसाठी, विशेषत: काँग्रेससाठी आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे.

एकीकडे तेलंगणा भागात स्वतंत्र तेलंगणासाठी जनभावना तीव्र झाल्या आहेत तर दुसरीकडे सीमांध्र प्रदेशात अखंड आंध्र प्रदेशासाठी लढा सुरु झाला आहे. आंध्रप्रदेश-स्वतंत्र तेलंगणाच्या विरोधात सींमांध्रच्या 13 जिल्ह्यांमध्ये बंद पुकारला आहे. राज्यसभेत आज मांडल्या जाणार्‍या तेलंगणा विधेयकाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी निदर्शन,रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने परिवहन आणि इतर प्रकारच्या सेवांवर परिणाम होत आहे.

दरम्यान, भाजपने मात्र या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

close