तेलगंणाच्या मुद्यावरून संसदेत रणकंदन

February 13, 2014 2:50 PM0 commentsViews: 710

346 telangana loksabha13 फेब्रुवारी :  दिल्लीमध्ये तेलंगणाचा मुद्दा आजही सर्व राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिला. तेलंगणा विधेयकावरून संसद आणि संसदेबाहेर महानाट्य सुरू आहे. गदारोळातच लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडण्यात आलं. तर तेलंगणा विरोधक सीमांध्रचे खासदार एल. राजगोलाप यांनी पेपर स्प्रे फवारला. तर तेलुगु देसमचे खासदार वेणुगोपाल यांनी चक्क चाकू सभागृहात आणला. पण, तो चाकू नाही तर माईक होता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. सभागृहात खासदारांमध्ये झालेल्या झटापटीत काही खासदार जखमीही झाले. एल राजगोपाल यांनी फवारलेल्या स्प्रेचा त्रास अनेक खासदारांना झाला. तिघांना अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्याचबरोबर लोकसभा, राज्यसभेत खासदारांना शांत करण्यासाठी मार्शल्सना बोलवावं लागलं. तर राज्यसभेत सीमांध्रच्या खासदारांनी अध्यक्षांचा माईक ओढण्याचा प्रयत्न केला.

11 वाजता कामकाज सुरू झाल्यानतंर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सीमांध्रच्या खासदारांनी प्रचंड गदरोळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. बारा वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गोंधळातच सरकारने तेलंगणा विधेयक पटलावर मांडलं. पण प्रचंड गदारोळ सुरू असल्याने अवघ्या काही सेकंदांच्या आतच पुन्हा एकदा कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

दुसरीकडं संसदेच्या बाहेरही तेलंगणावरून जबरदस्त गोंधळ झाला. तेलंगणा समर्थक आणि विरोधक संसदेबाहेर निदर्शनं करत होते. त्यांच्यात संघर्षही झाला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून निदर्शकांना बाजूला केलं. संसदेबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

close