मेधा पाटकर लोकसभा निवडणूक लढवणार

February 13, 2014 2:31 PM0 commentsViews: 1645

medha patakar13 फेब्रुवारी :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. देशभरातल्या जनआंदोलनातल्या कार्यकर्त्यांशी महिनाभर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार आहेत. पण आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र मेधाताईंनी अजून स्पष्ट केलं नाही.

घटनेची पायमल्ली करुन राज्य चालवणार्‍या सरकारला खाली पाडलंच पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. आज देशभरात जनआंदोलन चळवळीतील अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे जनआंदोलनातर्फे आपल्या आंदोलनाचे मुद्दे स्वत: राजकारणात उतरून मांडता यावे यासाठी निवडणूक लढवण्याचं ठरवलंय असं मेधाताईंनी सांगितलं.

यासाठी अनेक मान्यवरांसोबत बैठका झाल्यात त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पण आंदोलन संपवून आम्ही राजकीय दलदलीत उतरणार नसून आंदोलनं अधिक सशक्त करून निवडणूक लढवणार आहे असंही त्या म्हणाल्यात फक्त निवडणूक लढवायचं असं नाही तर राजकीय परीवर्तनासाठी हे आंदोलन आहे त्यामुळे ‘चुनाव नसून चुनौती’ आहे असंही मेधाताई सांगितलं. विशेष म्हणजे मेधाताईंनी आम आदमी पार्टीला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. पण आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मेधाताईंनी अजून वेटिंगवर ठेवलाय.

close