आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

March 4, 2009 3:17 PM0 commentsViews: 4

आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक 4 मार्च ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना बीएमसीची कचरा गाडी पळवल्याच्या आरोपाखाली 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.मुंबई महापालिका क्षेत्रातला कचरा ठाणे शहराजवळील डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्याने ठाणे शहरवासियांना होणा-या त्रासाच्या विरोधात आव्हाड यांनी हे आंदोलन केले होतं. तसंच या आधी आव्हाड यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी डम्पिंग ग्राऊंला जाणारा रस्ताही खोदला होता. त्यानंतर मुंबईच्या महापौरांना डेटॉल भेट दिलं होतं. आणि आता नुकतच त्यांनी बीएमसीचाच डम्पर वापरून बीएमसीच्या मुख्य इमारतीसमोर कचरा टाकण्याचं आंदोलन केलं. दरम्यान, ठाण्यातले एनसीपी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तसंच काही अज्ञात व्यक्तींनी ठाणे स्टेशन परिसरात 4 बसेसची तोडफोड केली. मात्र तोडफोड करणारे हे लोक एनसीपीचे कार्यकर्ते होते की नाही याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

close