माढाची जागा दिली नाहीतर महायुतीतून बाहेर पडू -जानकर

February 13, 2014 8:25 PM0 commentsViews: 1668

jankar13 फेब्रुवारी : माढा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मतभेद निर्माण झाले आहे. माढा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दावा केलाय.

ही जागा दिली नाही तर महायुती सोडू असा इशारा जानकरांनी दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोपही जानकरांनी केलाय.

माढ्याची जागा शेट्टींना सोडता कामा नये. आम्ही एक जागा जर हक्काची मागून पण देत नसतील आम्हांला तिसर्‍या आघाडीचा किंवा स्वतंत्रपणे 48 जागा लढवण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा जानकर यांनी दिलाय.

close