वॉचमनचा प्राचार्यांवर कुर्‍हाडीने हल्ला, शिपाई ठार

February 13, 2014 9:50 PM0 commentsViews: 957

stana collage13 फेब्रुवारी : नाशिक येथील सटाणा कॉलेजमध्ये एका वॉचमनने कुर्‍हाडीने प्राचार्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडलीय. या हल्ल्यात एका शिपायाचा मृत्यू झालाय. तर प्राचार्यांसह दोन प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहे.

कॉलेजचा वॉचमन बलवंत पाल याने कुर्‍हाडीनं प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या बचावासाठी धावलेले शिपाई दादाजी मगरे आणि दोन प्राध्यापकांवरही त्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यात मगरे ठार झाले तर प्राध्यापक अत्यवस्थ आहेत.

सकाळी 8.20 च्या दरम्यान हा थरार घडला. पोलिसांनी पालला आटक केली आहे. पण या हल्ल्यामागचं कारण कळू शकलेलं नाही. मानसिक वैफल्य किंवा पगारावरून वाद या दोन कारणांमधून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

close