महात्मा गांधींच्या जयंतीचा राज्यकर्त्यांना पडला विसर

March 4, 2009 5:53 PM0 commentsViews: 1

4 मार्च येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करायची की नाही, याविषयी सरकारी अधिकारी बुचकाळ्यात पडलेत. आणि याला कारण आहे ते सरकारचं परिपत्रक. सामान्य प्रशासन विभागानं 14डिसेंबर 2008 ला जारी केलेल्या या परिपत्रकात 2 ऑक्टोबरला असणार्‍या गांधी जयंतीबाबत काहीही उल्लेख नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता गांधींचा विसर पडला काय, याची चर्चा सुरू झालीये. परिपत्रकात सगऴ्या जयंत्या आणि पुण्यतिथींचा अगदी आठवणीनं समावेश करायला लावणारं सरकार, आता महात्म्याला विसरल्याचच यातून दिसून येतय. सरकारी कामकाजाचा ढिसाळपणा तर यातून दिसतोच आहे. शिवाय गांधींच्या वैयक्तिक वस्तूंचा लिलाव करण्यावरूनही वाद सध्या सुरू आहेत. त्यावरून गांधी आणि गांधी विचार हे फक्त स्वार्थासाठी वापरायचं प्रकरण झाल्याची खंतही व्यक्त होतीये.

close