‘जनलोकपाल’साठी केजरीवाल ठाम

February 13, 2014 11:16 PM0 commentsViews: 203

arvind kejrival13 फेब्रुवारी : दिल्लीत जनलोकपाल विधेयकाचा तिढा कायम आहे. केजरीवाल सरकारचं जनलोकपाल विधेयक आज (गुरूवारी) दिल्ली विधानसभेत सादर होऊ शकलं नाही.

कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे दिल्ली विधानसभेचं कामकाज उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.

पण, जनलोकपाल विधेयक सादर होऊ नये, यासाठी काँग्रेस आणि भाजप यांनी हातमिळवणी केली होती, असा आरोप केजरीवाल यांनी केलाय. कुठल्याही परिस्थितीत उद्या हे विधेयक मांडूच, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

close