मुंबईत पहिल्यांदाच ‘व्हॅलेंटाईन डे विथ रेन’

February 14, 2014 10:42 AM0 commentsViews: 669

valentine rain14 फेब्रुवारी : आज मुंबईकरांच्या ओठांवर रोमॅटिक गाणी आहेत, बर्‍याच जणांचा आज ऑफिसला जाण्याच्या मूड नहीये.. कारण ‘ये मौसम का जादू हैं…’. आज व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच प्रेमाचा दिवस आणि आजच्या दिवशीच पावसाने मुंबईत हजेरी लावत मुंबईकरांना सुखद भेट दिली.

मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत शुक्रवारी पहाटे अवकाळी हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी बरसल्या.

गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या तापमानात घट झाली आहे.त्यातंच आज पावसानं हजेरी लावल्यानं तिन्ही ऋतुंचा अनुभव मुंबईकरांच्या प्रेमाला ही बहर आलेला दिसतीये. पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी काही ठिकाणी प्रेमी युगुलं सकाळीच घराबाहेर पडली आहेत.

 

 

close