पंतप्रधानांनी केली कामाला सुरुवात

March 4, 2009 6:12 PM0 commentsViews: 2

4 मार्च, नवीदिल्ली निवडणुकांचा बिगुल वाजलाय. आणि काँग्रेससाठी आज एक चांगली बातमी आहे. आणि ती म्हणजे पंतप्रधान मनमोहनसिंग पुन्हा कामावर परतले आहेत. त्यांनी बेनिनचे अध्यक्ष बोनी यायी यांची भेट घेतली. बायपास सर्जरीनंतर पंतप्रधानांनी घेतलेली ही पहिलीच ऑफिसिअल भेट आहे. पंतप्रधानांवर 24 जानेवारी रोजी एम्समध्ये बायपास सर्जरी झाली होती. त्यामुळे ते 14 व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नव्हते. आता डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे फीट असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळे पाच आठवड्यानंतर पंतप्रधानांनी कामाला सुरुवात केली. यानंतर पंतप्रधान काही करारांवरही सही करण्याची शक्यता आहे.

close