पुढच्या आठवड्यात जाहीर होणार ‘आप’च्या उमेदवारांची यादी?

February 14, 2014 3:12 PM0 commentsViews: 814

AAP14 फेब्रुवारी :  लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षातर्फे उमेदवारांची यादी पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापैकी चार नावांवर सहमती झाल्याचं कळतंय. या चारपैकी तीन नावं महाराष्ट्रातले आहेत.

मयांक गांधी, मीरा संन्याल आणि विजय पांढरे यांची नावं नक्की झाल्याचं समजतंय. तर चौथा उमेदवार कुमार विश्वास हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.

याविषयी पक्षाची अधिकृत घोषणा होणं बाकी असलं तरी मयांक गांधी यांनी टिवट्‌रवरून आपल्या उमेदवारीला दुजोरा दिलाय. गुरुवारीच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण मतदारसंघ आणि पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट केलं नव्हतं.

पण मेधा पाटकर मुंबईतून निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर त्यांना ईशान्य मुंबई किंवा इतर कोणता मतदारसंघ ‘आप’ देणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आम आदमी पक्षानं काही दिवसांपूर्वी 20 अतिशय भ्रष्ट असलेल्या नेत्यांची आप ने एक यादी जाहीर केली होती. आणि त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची घोषणाही केली होती. ती यादीही पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘आप’ चे संभाव्य उमेदवार

  • मयांक गांधी – उत्तर पश्चिम मंुबई
    मीरा संन्याल – दक्षिण मुंबई
    विजय पांढरे – नाशिक
    कुमार विश्वास- अमेठी
close