मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे?

February 14, 2014 3:38 PM0 commentsViews: 1009

vijay kamble and mariya 3414 फेब्रुवारी : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नेमणूक होते याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. डॉ. सत्यपाल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर गेले 14 दिवस हे पद रिक्त आहे. या पदावर विजय कांबळे, राकेश मारिया किंवा सतीश माथूर यांच्यापैकी एकाची नेमणूक होण्याची शक्यता आहे.

यावेळी विजय कांबळे यांना सेवा ज्येष्ठते नुसार पोलीस आयुक्त होऊ शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे. सत्यपाल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारने पोलीस आस्थापना बोर्डाची स्थापना केली. स्थापनेनंतर दहा दिवसानंतर बोर्डाची बैठक झाली. बोर्डाच्या सदस्यांनी आता शिफारस केली आहे. यावेळी विजय कांबळे यांच नावं सेवा ज्येष्ठते नुसार पहिल्या क्रमांकावर आहे.

विजय कांबळे हे सध्या सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य महामार्ग पोलीस या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात सध्या 1980 आणि 1981 च्या बँचचे सेवेत ज्येष्ठ आहेत. डॉक्टर सत्यपाल सिंग, जावेद अहमद, के.पी.रघुवंशी, विजय कांबळे हे अधिकारी 1980 च्या बँचचे आहेत .तर सतीश माथूर, पी.के.जैन, राकेश मारिया हे अधिकारी 1981 च्या बँचचे आहे. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिला. तर राज्य पोलीस दलातील पोलीस महासंचालक होमगार्ड आणि पोलीस महासंचालक सिक्युरिटी ही दोन पद रिक्त आहेत. या पदावर जावेद अहमद आणि के.पी.रघुवंशी यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सेवा ज्येष्ठतेत सर्वात वरच्या स्थानावर असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कांबळे यांनी नेमणूक मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. विजय कांबळे यांनी मुंबईत वेगवेगळ्या पदावर काम केलंय. पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस सह आयुक्त, वाहतूक, पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य महामार्ग पोलीस या पदावर कार्यरत आहेत.

close